Breaking News

पारनेर शहरात पोलिस व नगरपंचायत यांची विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई!

पारनेर शहरात पोलिस व नगरपंचायत यांची विनामास्क फिरणाऱ्या  नागरिकांवर कारवाई!
------------
काल दिवसभरात दहा व्यक्तीवर गुन्हे दाखल 33 वर दंडात्मक       कारवाई !

पारनेर प्रतिनिधी :
     पारनेर शहरांमध्ये संसर्ग वाढत आहे तसेच शहरात अनेक नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाहीत त्यामुळे पारनेर पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांनी संयुक्त मोहीम राबवली या मोहिमेत विना मस्त व नियमांचे पालन न करणाऱ्या दहा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 नागरिकांन वर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सोळा हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यामध्ये कोरोना त्याचा संसर्ग वाढत आहे तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात अनेक नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाहीत यामुळे पारनेर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची धडक मोहीम काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे या मोहिमेंतर्गत पारनेर शहरात पोलीस  व नगरपंचायत यांनी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली काल पारनेर मध्ये दहा नागरिकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.