Breaking News

पारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर !

पारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी झाली यामुळे
हंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला.


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे बराच वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते तर काही भागांमध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला त्यामुळे परिसरातील ओढे नाला नदी यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आला होता तसेच शेतीचे बर्याच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे काही जनावरे या पुरामध्ये वाहून गेल्याची देखील बातमी समोर येत आहे.


तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतीला पाण्यासाठी पावसाची मोठी गरज असते मात्र अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे त्यातच आज दुपारी शहरासह परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस बरसला दोन ते तीन तास पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे सर्व ओढे नाले ओसंडून वाहत होते अनेक भागांमध्ये रस्त्यांच्या पुला वरती पाणी आल्याने रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती पारनेर शहरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हंगा तलावाला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रवाह झाल्याने तलाव वाटे मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला त्यामुळे तलावा खालील नदीला देखील मोठा पूर आला त्यामध्ये वाघुंडे येथील दत्त मंदिर पाण्याखाली आले तसेच काही जनावरे देखील या परिसरामध्ये वाहून गेल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. मात्र ही अफवा असल्याची    माहिती  मिळाली आहे.
दरम्यान हंगा नदीला आलेल्या पुरात मुगशी येथील 50 वर्षीय  दत्तात्रय दिनकर थोरात ही व्यक्ती वाहून गेली असल्याची माहिती मिळाली आहे.