Breaking News

खासदार विखे च्या प्रयत्नातून अळकुटी ते राळेगण थेरपाळ रस्त्यासाठी सोळा कोटीचा निधी- सुजित झावरे

 


पारनेर प्रतिनिधी - खासदार सुजय विखे पाटील यांच्या विषेश प्रयत्नातुन पारनेर तालुक्यातील अळकुटी ते राळेगण थेरपाळ या रस्त्यासाठी केंद्रातुन  सोळा कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला असुन लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राळेगण थेरपाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.

 आधिक माहीती देताना श्री. झावरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सन २०१९ च्या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास योजने अंतर्गत दि. १९ रोजी पारनेर तालुक्यातील अळकुटी देवीभोयरे-निघोज (एन एच ६) रस्त्यासाठी १६,३६,०८,८०८/- रु. इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. नगर दक्षिण लोकसभेचे खासदार मा. श्री. सुजय विखे पाटील यांचेकडे सुजित झावरे पाटील यांनी ग्रामस्थासमवेत सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली. सुजित पाटील तात्काळ दखल घेत मा खा सुजय विखे पाटील यांना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी  यांचेकडे पाठपुरावा केला होता.

 खा. विखेच्या मागणीनुसार सदर रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास योजने अंतर्गत १६,३६,०८,८०८/इतका निधी मंजूर केले व पारनेर तालुक्यातील अळकुटी, लोणीमावळा, वडझिरे, देवीभोयरे, वडगाव गुंड, निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, इ गावासाठी सर्वात मोठा ३९ किलोमीटरचा रस्ता मंजूर झाल्याने यासर्व गावातील ग्रामस्थानी खा सुजय विखे पाटील यांचे आभार मानले. सदर रस्त्यावरून ऊस, दूध, भाजीपाला इ मालाची आवक जावक मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच उर्वरित राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा रस्ताच्या मागणीसाठी पुढील आठवड्यात खा. सुजय विखे पाटील बरोबर सुजित झावरे पाटील दिल्ली येथे जाऊन केंद्रीयमंत्री यांची भेट घेऊन सदर रस्तासाठी निधी मंजूर करणेबाबत मागणी करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भाजपा पारनेर तालुका माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा भाजपा निमंत्रित सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी बाजार समिती सभापती बापू भापकर, सचिन वराळ पाटील, रवींद्र पाडळकर, सरपंच पंकज कारखीले, उपसरपंच योगेश आढाव, उमेश सोनवणे, निलेश घोडे, अमोल रासकर उपस्थित होते.