Breaking News

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना, डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन

Arjun Kapoor tests coronavirus positive, is asymptomatic and in  home-isolation - Movies News

 मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे (Arjun Kapoor Tested Positive For COVID-19). याबाबत स्वत: अर्जुन कपूरने माहिती दिली. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. अर्जुनने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. सध्या अर्जुनने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत: घरी क्वारंटाईन केलं आहे (Arjun Kapoor Tested Positive For COVID-19).

अर्जुन कपूरने पोस्ट केली, 'तुम्हा सर्वांना सूचित करणं माझं कर्तव्य आहे की माझा कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठिक आहे. माझ्यात कुठलीही लक्षणं नाहीत. मी डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी होम क्वारंटाईन आहे.'

'तुमच्या समर्थनाबद्दल मी आधीच आभार मानतो. येणाऱ्या दिवसांमध्ये मी माझ्या प्रकृतीबाबत अपडेट देत राहिल. ही एक विलक्षण आणि अभूतपूर्व वेळ आहे.', असंही अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं.

अर्जुनला कोरोना झाल्याचं कळताच त्याचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी तो लवकरात लवकर बरो व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, अर्जुनची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड सोलिब्रिटी मलायका अरोरालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही