Breaking News

गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर

For security reason the legislature session on maharashtra assembly closed  | सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळ अधिवेशन घेतलं आटोपतं | Loksatta

- मुश्रीफांना प्रशासक नेमण्याची घाई: फडणवीसांचा  आक्षेप

- विरोधकांचा सभात्याग

मुंबई/ प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात घमासान पाहायला मिळाले. अखेर ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर होताच विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पटलावर मांडलेल्या ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. कोर्टात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, कोर्टाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे, कोर्टाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार नियुक्ती करा, अशी मागणी फडणवीसांनी केली. त्यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल निवडताना काही जाहिरात देता का? जो सुटेबल असेल तो व्यक्ती नेमतात ना? असा प्रतिप्रश्‍न केला. खासगी व्यक्ती आम्ही नेमत नाही, सरपंचांना मुदतवाढ देता येत नाही, तसा नियम नाही असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले. मुश्रीफ यांना ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याची घाई झाली आहे, पण आम्ही नियमबाह्य पद्धतीने ते होऊ देणार नाही, अशी भूमिका देवेंद्र  फडणवीस यांनी घेतली. तेव्हा हे बिल वेगळे आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतरही, संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे चुकीचे आहे, हा चुकीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत ग्राम पंचायत प्रशासक नेमण्याच्या विधेयकावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. 


विधिमंडळात प्रवेशावरून उडाला गोंधळ

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, कर्मचारी, पत्रकार, पोलिस कर्मचारी यांचे कोरोना रिपोर्ट पाहून ते नेगेटिव्ह असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार होता. तसे नियोजनही करण्यात आले होते. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, अधिवेशनाचा पहिला दिवस असूनही अनेकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स आलेले नव्हते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार ऐकून घेत अजित पवारांनी सर्व सिच्युएशन आपल्या हातात घेतली. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना बोलावून घेतले व त्यांना सूचना करत आमदारांना आत सोडण्यास सांगितले. वैयक्तिक रिपोर्ट पाहून आमदारांना आत सोडण्यात आले.