Breaking News

राजेश्‍वरी कोठावळे यांचा कोरोना रुग्णांना योगाद्वारे मानसिक आधार !

राजेश्‍वरी कोठावळे यांचा कोरोना रुग्णांना योगाद्वारे मानसिक आधार
-----------
कोरोना रुग्णांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास योगाची मदत


टाकळी ढोकेश्‍वर/प्रतिनिधी : 
     पारनेर तालुक्यातील सांगवी सुर्या येथील योगशिक्षक राजेश्‍वरी कोठावळे या शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना खर्‍या अर्थाने योगाचे धडे देऊन मानसिक आधार देण्याचे काम करत आहेत.
             पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. कोरोनाचे संक्रमण आता पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत देखील राजेश्‍वरी कोठावळे या आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमधील रुग्णांना योगाचे धडे देऊन त्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास मदत करत आहे. योगाच्या धडयामुळे कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत अनेक रुग्णांनी यावेळी नोंदवले. पारनेर तालुक्यातील कार्जुले हर्या येथे  पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राज्यातील सर्वात मोठे 1000 बेडचे अद्यावत असे शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर सुरू केले. या ठिकाणी आज 100 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. पारनेर तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून कोवीड रुग्णांच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोकून देते जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोवीड रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग साधना अत्यंत उपयुक्त आहे आणि अशा परिस्थितीत योग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतलेल्या  राजेश्‍वरी कोठावळे या रोज न चुकता पारनेर शहरातील शासकीय कोविड सेंटर व कार्जुले हर्या येथील येथील कोवीड सेंटरमधील रूग्णांना मालेगाव पॅटर्न नुसार डॉक्टर उज्वल कापडणीस यांचा ओम शांतीवर आधारित म्युझिकल योगा व राजयोग मेडिटेशन वर्ग  त्या घेत आहेत. 
  
योगाचे धडे देऊन रुग्णाचे मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचे काम त्या खर्‍या अर्थाने करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णाच्या शरीरातील  रोग प्रतिकारशक्ती त्यामुळे वाढत आहे आणि या माध्यमातून अनेक रूग्ण बरे झाले आहेत.
     कोरोनाच्या रुग्णांसाठी राजेश्‍वरी कोठावळे  जीवावर उदार राहून करत असलेले हे समाजपयोगी काम नक्कीच प्रेरणादायी असून त्या खर्‍या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. राजेश्‍वरी कोठावळे यांना हे कोरोना रुग्णांसाठीचे समाज उपयोगी काम करण्यासाठी आई वडिलांचा कुटुंबाचा असलेला पाठींबा नक्कीच कौतुकास्पद आहे. कोरोना सारख्या भयंकर संकटात राजेश्‍वरी कोठावळे जो संघर्षमय लढा देत आहेत त्यामुळे त्या पारनेर तालुक्यासाठी एक संघर्ष कन्या म्हणून पुढे येत आहेत.