Breaking News

शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगांवकरांच्या सेवेत रुजू

शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगांवकरांच्या सेवेत रुजू
-----------
स्वयंसेवी संस्था, दानशूर, डॉक्टर, आय.एम.ए. एकत्र येत  लोकसहभागातून ५० बेडचे हॉस्पिटल
-----------
चहा, नाष्टा , जेवण मोफत  दिले जाणार


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगांवातील प्रशासन व वैद्यकीय विभाग यांचे नियंत्रणाखाली विविध स्वयंसेवी संस्था,दानशूर,कोपरगांवातील डॉक्टर, आय.एम.ए.यांनी एकत्र येत  लोकसहभागातून ५० बेडचे बेट नाका जवळील लायन्स मुकबधीर विद्यालयात शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगांवकरांच्या सेवेत रुजू केले आहे.

कोपरगांव तालुक्यात कोरोना संसर्ग निर्मुलनासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत तहसिलदार योगेश चंद्रे,तालुका पोलिस निरिक्षक अनिल कटके,शहर पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,शहरी आरोग्य अभियानाच्या डॉ.गायत्री कांडेकर,निवासी नायब तहसिलदार योगेश्वर कोतवाल, समन्वयक सुशांत घोडके यांचेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे सहा महिण्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहे.

दिवसेंदिवस कोरोना संसर्ग रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे  एस.एस.जी.एम.काँलेज येथे सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटर येथे अतिरिक्त रुग्ण ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.त्यामुळे प्रशासकीय विभाग व स्वयंसेवी संस्था, दानशूर,कोपरगांवातील डॉक्टर, आय.एम.ए.यांनी एकत्र येत  लोकसहभागातून ५० बेडचे बेट नाका जवळील लायन्स मुकबधीर विद्यालयात शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगांवकरांच्या सेवेत रुजू केले आहे.
शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर येथे वैद्यकीय औषधोपचार सोबत लोकसहभागातून चहा, नास्ता,पाणी,दुपार व सायंकाळ जेवण मोफत सेवा दिली जाणार आहे.त्याचबरोबर रुग्णांचे समुपदेशन केले जाणार आहे. 

    सकाळचा चहा व नास्ता कोपरगांव तालुका बँडमिंटन असोसिएशन,संदिप रोहमारे,मनिष कोठारी व सर्व सहकारी, दुपारचे जेवण श्री बालाजी सुपरमार्केटचे संचालक सुधीर डागा,सायंकाळ जेवण सौ सुनाईबाई पोपटलाल बंब ,सुनील बंब व परिवार, नियमित पिण्याचे पाणी सूर्यतेज संस्था व कोपरगांव नगरपरिषद,जीवनधारा प्रकल्प,वापर पाणी व्यवस्थापन (अंघोळ गरमपाणी सह) गुरसळ सर यांचे मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचारी असणार आहे.

तसेच नियमित रुग्णांची आरोग्य तपासणी,नोंद,आरोग्य विभाग,पंचायत समिती,कोपरगांव डॉ.संतोषजी विधाटे, इंडियन मेडिकल असोसिएशन, कोपरगांव यांचे वतीने डॉ. मयुर जोर्वेकर, व आय.एम.ए.सदस्य,डॉ. अमोल अजमेरे,डॉ.अमरीश मेमाणे यांचे सह डॉक्टर सेवा देणार आहे.याच बरोबर सन रायझर ग्रुपचे डॉ. अजेय गर्जे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड व सर्व सदस्य मोबाईल द्वारे आरोग्य समुपदेशन करणार आहे.रुग्ण तणावमुक्ती समुपदेशन करिता रा.स्व.संघ सेवाकार्य विभाग सौ.दिपालीताई पटवर्धन, सौ.वृंदाताई कोर्हाळकर,अँड.जयंत जोशी यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कार्य करणार आहे.रुग्णांना अन्न व औषध सेवा देण्यासाठी प्रशिक्षित नियुक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. तर स्वच्छतेस आरोग्य विभाग कोपरगांव नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली नियुक्त सफाई कर्मचारी करणार आहे. तर १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे.कोपरगांव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची गरज ओळखून प्रशासन आणि लोकसहभागातून सुरु झालेले शुक्रतीर्थ कोरोना केअर सेंटरचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.