Breaking News

बाबुजी आव्हाड महविद्यालयात क्रीडा दिन साजरा !बाबुजी आव्हाड महविद्यालयात क्रीडा दिन साजरा ! पाथर्डी/प्रतिनिधी :
    भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त येथील बाबुजी आव्हाड महविद्यालयात दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन केले.
     प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी आजच्या जीवनशैलीत खेळाचे व व्यायामाचे असणारे महत्व विषद केले. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या Seven days step Challenge या उपक्रमामध्ये भाग घेतला.  यामध्ये दररोज १० हजार स्टेप चालणे असे एकूण ७ दिवसात ७० हजार स्टेप चालणे या बाबीचा समावेश आहे. 

    या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट, डॉ. बबन चौरे, डॉ. अशोक कानडे, प्रा. दत्तप्रसाद पालवे, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. भगवान सांगळे, डॉ. अशोक डोळस, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ. अजयकुमार पालवे, पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे, प्रा. प्रदिप वारूळकर व खेळाडू उपस्थित होते.