Breaking News

शेतकऱ्याचे कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली अकोल्यातील भात शेतीची माहिती !

शेतकऱ्याचे कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली अकोल्यातील भात शेतीची  माहिती !


 अकोले /प्रतिनिधी :
      जय जवान जय किसान चा नारा देशाला सक्षम करू शकेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेती करून विकेल तेच पिकेल या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.
     अकोल तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकऱ्याने  केलेल्या भातशेतीच्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले मेहंदुरी  येथील विकास देवराम आरोटे या शेतकऱ्यांने केलेल्या परदेशातील नावीन्यपूर्ण भात वाणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेत परदेशातील औषधी गुणधर्म असलेल्या भाताच्या वाणाची लागवड केल्याबद्दल कौतुक करीत हेच तंत्रज्ञान गट शेतीत परावर्तित करून शेतकऱ्यांना सक्षम करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी सरकार पातळीवर पाहिजे तेवढी मदत सरकार  शेतकऱ्यांना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकेल तेच पिकेल योजनेतून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करून संघटित शेतीसाठी पुढाकार घेण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. शेतकरी अन्नदाता म्हणजेच साक्षात परमेश्वर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी गौरवोग्दार काढले.  कृषी विभागाने काळाची पावले ओळखत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना  त्यानी कृषी विभागाला दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विकास आरोटे यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांना भात वाणाची माहिती दिली.
     यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, आ. किरण लहामटे,तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी,मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब बांबळे,बाळनाथ सोनवणे, राजाराम साबळे, संतु वारडे, हरीभाऊ जाधव,संतोष साळवे, नवनाथ आरोटे,मयुर गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक भास्कर आरोटे, डॉ अविनाश कानवडे, विकास बंगाळ उपस्थित होते.   
--