Breaking News

अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामातला निधी टक्केवारीत - सचिन भालेकर

अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामातला निधी टक्केवारीत - सचिन भालेकर
---------------
पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा!
----------------
पारनेर तालुक्यातील रस्त्याचे कामांचे ऑडिट करावे पारनेर परिवर्तनची मागणी.
---------------
जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व बांधकाम मंत्रालयाला निवेदन.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील सर्व प्रकारच्या निधीतून मागील 5 वर्षात जे काही नवीन रस्ते, किंवा जुन्या रस्त्यांच्या दुरुस्त्या झाल्या आहेत त्यांची तातडीने चौकशी करून या रस्त्याचे ऑडिट त्रयस्थ यंत्रणेमार्फत केले जावे अशी मागणी पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मागील पाच वर्षात पारनेर तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे वेगवेगळ्या प्रकारच्या निधीतून झाली, परंतु आज घडीला रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते हेच कळत नाही, अनेक ठिकाणी तर रस्त्यांचे गटार झाले आहे अश्या परिस्थिती मध्ये अनेक नागरिकांचे अपघात होत आहेत आणि त्या अपघातामुळे अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत तसेच अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे म्हणूणच या सगळ्या रस्त्यांचे त्रयस्थ यंत्रनेमार्फत ऑडिट केले जावे आणि ऑडिट चा अहवाल हा जनतेसमोर मांडला जावा, या अहवालात दोषी असणाऱ्या कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी परिवर्तन ने केली आहे.


याबाबत परिवर्तन तर्फे जिल्हाधिकारी, मा मुख्यमंत्री व बांधकाम मंत्रालयाला निवेदने पाठवले आहेत व एक महिन्यात या बाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन तसेच जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय असेल असे परिवर्तनचे सुकाणू समिती अध्यक्ष सुहास शेळके यांनी दै. लोकमंथन शी बोलताना नमूद केले.

 "अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामातला निधी हा टक्केवारीत अडकतो आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते, फक्त निधी खर्च करणे हेच धोरण शासकीय यंत्रणांचे असते, जनतेप्रति संवेदना ना अधिकाऱ्यांना आहे ना लोकप्रतिनिधींना उघड्या डोळ्यांनी खड्डयात जाणारी जनता पाहून ठेकेदार, राजकारणी, आणि अधिकारी यांना त्याचे काहीही वाटत नाहीत या सगळ्यांच्या संवेदना मेल्या आहे त्यांची जागा ही फक्त तुरुंगात आहे.
------------------
सचिन भालेकर 
अध्यक्ष परिवर्तन फाऊंडेशन