Breaking News

पारनेर तालुका भाजपच्यावतीने मोदींचा वाढदिवस वृक्ष लागवड करत साजरा !

पारनेर तालुका भाजपच्यावतीने मोदींचा वाढदिवस वृक्ष लागवड करत साजरा


पारनेर प्रतिनिधी -
पंतप्रधान.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 झाडांची लागवड करण्यात आली. मोदींचा वाढदिवस तालुक्यामध्ये साजरा केला वृक्ष लागवडीमुळे निसर्गाची हानी रोखली जाऊ शकते यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती तालुका भाजपच्या वतीने देण्यात आली.
देशावर असणारे कोरोना चे संकट त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाबरोबरच प्रशासनाचे चाललेले प्रयत्न मानवाकडून निसर्गाची हानी होत असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी पर्यावरण जपणे खूप गरजेचे आहे त्यासाठी वृक्ष लागवड केली गेली पाहिजे म्हणून तालुकाभाजपने हा उपक्रम राबवला आहे.
      याप्रसंगी उपस्थीत भाजपचे तालुकाध्यक्ष  वसंत चेडे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे,जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.अश्विनीताई थोरात,पारनेर तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. उषाताई जाधव, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे,सोशल मिडिया प्रमुख दिलीप पारधी,महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ.अनुराधा पावळे,सतिश म्हस्के व भाजपचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.