Breaking News

बायकोसाठी केला पोलिस ठाण्यासमोर आत्महत्याचा प्रयत्न !

बायकोसाठी केला पोलिस ठाण्यासमोर आत्महत्याचा प्रयत्न !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
माहेरी असलेल्या बायकोला नवरा घेयाला येवूनही नवऱ्याबरोबर न पाठविल्याचा राग मनात धरुन नवरोबाने थेट बाटलीत पेट्रोल भरुन आपल्या दुचाकीवर जावून नेवासा पोलिस ठाण्याच्या प्रवेशव्दारातच अंगावर पेट्रोल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवार (दि.२७) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
   याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, श्रीरामनगर (शिर्डी) ता.राहता येथील गणपत दगडू पवार (वय ३५) हा नवरोबा त्याच्या पत्नीला शनिवार (दि.२६) रोजी तीच्या माहेरी गोगलगाव (ता.नेवासा) येथे भेटण्यासाठी घेवून गेला व त्याच्या पत्नीला माहेरी सोडुन परत  गावी शिर्डी येथे आला होता.पुन्हा रविवारी सकाळी गणपत पवार हा सासूरवाडीला जावून बायकोला घेवून येण्यासाठी गेला असता बायको त्याच्या बरोबर न आल्यामुळे त्याचा राग मनात धरुन रविवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास हा नवरोबा आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम.एच १७ बी.डब्यु ०११४) थेट नेवासा पोलिस ठाण्याच्या प्रवेशव्दारातच दुचाकी उभी करुन डिक्कीतील पेट्रोलची बाटली काढून अंगावर पेट्रोल ओतून घेतले हा प्रकार वायरलेस विभागात नेमणूकीस असलेल्या पो.कॉ.सतिष गोरक्षनाथ देसाई यांच्या व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार बघितला असता त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता बायको बरोबर आली नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवरोबा गणपत पवार याच्यावर भा.द.वी.कलम ३०९ प्रमाणे नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.