Breaking News

कोपरगाव मधील टपरी धारकांचे पुनर्वसन करा-माजी नगराध्यक्ष

कोपरगाव मधील टपरी धारकांचे पुनर्वसन करा-माजी नगराध्यक्ष


करंजी प्रतिनिधी- 
कोपरगाव नगरपालिकेला श्रमिक राज कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष विजय वाहडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले.

   माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय विघे, सचिव गणेश पवार, संघटक राहुल धिवर, नितीन शिंदे संजय सोनवणे, राहुल पहिलवान आदि उपस्थित होते.

दिनांक १० मार्च २०११ रोजी कोपरगाव नगरपालिका अतिक्रमण काढली त्यानंतर विस्थापित टपरी धारकांच्या वतीने वेळोवेळी कोपरगाव नगरपालिकेला निवेदने दिली. उपोषणे केली, आंदोलने केली, तरी देखील तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी फक्त आश्वासने दिली, परंतु विस्थापित धारकांच्या साठी ठोस असे निर्णय घेतला नाही.

आज दहा वर्ष होऊन गेली तरीदेखील नगरपरिषदेने विस्थापित टपरी धारकांच्या बाबतीत कधीही पुनर्वसनाचा विचार केला नाही .त्यामुळे टपरीधारक देशोधडीला लागला तर काहींचे प्रपंच बरबाद झाले, तर काहींनी आत्महत्या केल्या, काहींनी कोपरगाव सोडून उदरनिर्वाहासाठी बाहेर निघून गेले, काही लोकांचे बँकेच्या हप्ते न गेल्यामुळे स्वतःचे मालकीचे घरे विकून बँकेचे हप्ते भरावे लागले तर काहींच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिले. आजही विस्थापित भटकंती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे .

तसेच नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून विषय मंजूर करून घेण्यात यावा व लवकरात लवकर विस्थापित धारकांचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी श्रमिकराज कामगार संघटना व जनआंदोलन’च्या वतीने करण्यात आली आहे