Breaking News

गुंजाळवाडी पठार येथे वीज पडून गाय व बैलाचा मृत्यू !

गुंजाळवाडी पठार येथे वीज पडून गाय व बैलाचा मृत्यू


संगमनेर/प्रतिनिधी
       संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार परिसरात काल रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एक बैल व एका गायीचा मृत्यू झाला.  गुंजाळवाडी पठार येथील शेतकरी भाऊसाहेब केसू कराळे यांनी रविवारी नेहमीप्रमाणे आपली गुरे शेतात चरण्यासाठी बांधली होत. अचानक दुपारी १२ च्या दरम्यान वीजांचा कडकडाट झाला. यावेळी वीज अंगावर पडून एक बैल व एका गायीचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की परिसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी घाबरले.
     या घटनेत त्यांचे १ लाखांचे नुकसान झाले. सदर घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गाईचे शवविच्छेदन केले. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे सरपंच रवी भोर यांनी केली आहे.