Breaking News

शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांना आयकर विभागाची नोटीस

निवडणुकीतील शपथपत्रावर प्रश्‍नचिन्ह
उत्तर न दिल्यास दिवसाला 10 हजारांचा दंड

मुंबई/ विशेष प्रतिनिधी

संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकीत सादर करण्यात आलेल्या शपथपत्रासंदर्भात आहे. पवारच नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्रात सध्या भाजप आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांची माहिती मागवली आहे. यामध्ये पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.