Breaking News

महाराष्ट्र राज्य बायोडिझेल डीलर असोशियशन ची स्थापना अध्यक्ष पदी रतन देवरे यांची निवड !

महाराष्ट्र राज्य बायोडिझेल डीलर असोशियशन  ची स्थापना 
अध्यक्ष पदी रतन देवरे यांची निवड !


अकोले / प्रतिनिधी :
 बायोडिझेल हे स्वदेशी असलेमुळे शेतकरी वर्गाला तर जास्त मायलेज मुळे वाहन मालक यांना फायदेशीर आहे असे मत  रतन देवरे यांनी व्यक्त केले यावेळी बायोडिझेल डीलर महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्षपदी रतन देवरे तर उपाध्यक्ष पदी प्रवीण धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तर कायदेशीर सल्लागार म्हणून अँड के. डी. धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
       अकोले तालुक्यातील विरगाव येथे महाराष्ट्र राज्यातील बायोडिझेल डीलर यांची बैठक संपन्न झाली यावेळी राज्यातील सर्व डीलर यांची संघटना स्थापन करण्याचा ठराव संमत झाला त्यात कार्यकारणी निवडण्यात आली.
           बायोडिझेल बी१०० हे जैविक डिझेल असून हे पेट्रोलियाम पदार्थांचे मध्ये येत नाही. बायोडिझेल हे स्वदेशी असून भारतात तयार होत असलेमुळे शेतकरी वर्गाला फायदा होत आहे. शिवाय परकीय चलन मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. बायोडिझेल मुळे प्रदूषण होत नाही अन मायलेज वाढत आहे. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक यांनी कर्ज काढून पंप उभे केले आहे. 
          देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून बायोडिझेल तयार झाले आहे. देशातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाले आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी बायोडिझेल पंप चालक भेसळ करून हि पंप बदनाम करीत आहे तसेच काही पंप चालक कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना पंप सुरू करीत आहे यासाठी संघटना स्थापन करण्यात यावी असे या बैठकीत ठरले. भेसळ करणाऱ्या व अनधिकृत पंप चालकांवर कारवाई करावी असेही सर्वानुमते ठरले.
        बायोडिझेल हे जैविक असल्याने पेट्रोलियम अधिनियम २००२ नुसार च्या तरतुदी या पंपाना लागू होत नाही. या अधिनियम च्या १४६ प्रमाणे पेट्रोलियम अधिकारी यांच्या ना हरकत दाखल्याची गरज नाही असे सांगितले आहे. बायोडिझेल च्या किरकोळ विक्री व साठा करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 
          भारताच्या  सरकारी पेट्रोलियम कंपन्या हिंदुस्थान, भारत या कंपन्या तसेच रिलायन्स, रशियाची इस्सार या    डिझेल पेट्रोल आयात करतात व धंदा करतात. त्या आपले परकीय चलन दुसऱ्या देशात नेतात. मात्र स्वदेशी असणारं बायोडिझेल ला अनेक ठिकाणी अडवणूक केली जाते म्हणून संघटना स्थापन करण्यात आली आहे.
      बायोडिझेल पंप जी एस टी धारक असून सर्व काम कायदेशीर पध्दतीने चालू आहे. मात्र पेट्रोलियम पदार्थ नसल्याने पेट्रोलियम कंपन्या शी काही संबंध नाही. बायोडिझेल हे इतर डिझेल पेक्षा स्वस्त आहे त्यामुळे वाहन चालक यांचा फायदा होतो. बायोडिझेल मुळे शेतकरी, वाहनचालक यांना फायदा होतो तसेच देशातच रोजगार उपलब्ध होतो अन पंप चालक हे बेरोजगार युवक आहेत त्यांना हि काम मिळाले आहे.
        बायोडिझेल डीलर महाराष्ट्र राज्य असोसिएशन स्थापन करण्यात आली असून कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष रतन देवरे, उपाध्यक्ष प्रवीण धुमाळ, अशोक नागोटे, किशोर साळुंके, सचिव योगेश पाटील, सहसचिव शांतीलाल पवार सदस्य हरिष अहिरे, जगदीश निकम, गणेश रायसोनी, माधव धुमाळ, ज्ञानदेव सरोदे, महंमद असरुद्दीन, मनोज पाटील, संजय गवळी, नामदेव ढमक, योगेश जैन आदी ची निवड करण्यात आली आहे.
------