Breaking News

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण

 prajakat tanpure visits wambori rural hospital | Sarkarnama

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. अशातच अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. नुकतचं राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती, त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता, त्यात तनपुरे पॉझिटिव्ह आले आहे.

तनपुरे यांनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, "सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार" असे ट्विट तनपुरे यांनी केले आहे.