Breaking News

शहरातील कसबा व्यायाम सुरू करण्याची मागणी !

शहरातील कसबा व्यायाम सुरू करण्याची मागणी !


पाथर्डी प्रतिनिधी :
शहरातील मधव्यवर्ती असलेली कसबा व्यायाम शाळा कोविड १९ महामारीमुळे बंद ठेवण्यात आली असुन,सदरील व्यायाम शाळा सुरू करण्याची मागणी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे त्या परिसरातील युवकांनी केली आहे.

  यावेळी बोलताना अमोल बोरुडे यांनी म्हटले की,सध्या कोविड १९ च्या काळात प्रतिक्रिया शक्ती वाढण्यासाठी शारीरिक कसरत करणे गरजेचे आहे.तरी सदर व्यायाम शाळा पालिका प्रशासनाने कोविड १९ ची सर्व नियमावली जाहीर करत सुरू करावी असे मत व्यक्त केले.
   यावेळी अमोल बोरुडे,प्रकाश बालवे,पालवे आदी जण उपस्थित होते.