Breaking News

कोपरगाव शहरात गायी चोरणारी टोळी सक्रिय

कोपरगाव शहरात गायी चोरणारी टोळी सक्रिय
  

 करंजी प्रतिनिधी :
 कोपरगाव शहरातील मोकाट फिरणा-या जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तली साठी तस्करी करणाऱ्या चोराची टोळी सक्रिय झाली आहे.
   कोपरगाव शहरासह परिसरात गेल्या काहि महिन्यांपासुन घराबाहेर बांधलेले किंवा मोकाट फिरणारे गाय, गुरे, म्हशी अशा पशुधनांला भुलीचे इंजेक्शन देवुन चोरी करत तस्करी केली जात असावी अशी चर्चा होत असतांना हे खरं असल्याचा प्रत्यय दि २८  सप्टेंबर रोजी पहाटे कुलस्वामिनी मंगल कार्यालय जवळ हा प्रकार घडल्यामुळे तालुक्यातील नागरिक बरोबर शेतकरी वर्ग देखील सावध झाले आहे.
    पोलिसांनी  सदर प्रकरणाची दखल घेवुन तस्करी करणा-यांचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीसांच्या दृष्टीने हा विषय किरकोळ असला तरी त्यांच्या समोर आवाहन आहेतच. शहरात गायी चोरणारी ठराविक टोळी आहे ही टोळी दिवसा ‘रेकी करुन कुठे गायी, म्हशी, बाहेर बांधलेल्या असतात याचा आढावा घेते आणि रात्री मालवाहू रिक्षा, आदि मोठया गाडी घेवुन त्यात तस्करी केली जाते. तस्करी करणारी ठराविक मंडळी असुन शहरातीलच असल्याचे बोलले जात आहे परंतु चोरी केलेल्या गायींचे पुढे काय केले जाते या प्रश्नांचे उत्तर ही टोळी ताब्यात घेतल्यानंतरच पुढे येणार आहे.