Breaking News

राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोपरगाव सहसचिव पदी दैनिक लोकमंथनचे प्रतिनिधी प्रा. विजय कापसे सर !

 
राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोपरगाव सहसचिव पदी दैनिक लोकमंथनचे प्रतिनिधी प्रा. विजय कापसे सर !


कोपरगांव प्रतिनिधी :- 
     महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कोपरगांव तालुका कार्यकारणी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राहणे, जिल्हा सचिव चंद्रकांत झुंरगे यांच्या आदेशान्वये कोपरगांव तालुका अध्यक्ष मनीष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली  दि ३ सप्टेंबर रोजी झालेल्या मीटिंग मध्ये एकमताने  जाहिर झाली आहे. 
     यात दैनिक लोकमंथन चे करंजी प्रतिनिधी विजय कापसे यांची सह-सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचा या निवडीबद्दल लोकमंथन चे मुख्य संपादक डॉ अशोक सोनवणे सर, कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे, व्यवस्थापकीय संपादक रोहित सोनवणे, निवासी संपादक बाळकृष्ण आहिरे, जाहिरात विभाग प्रमुख बाबासाहेब जठार सर  उपसंपादक वेब एडिशन गणेश जगदाळे, कोपरगाव प्रतिनिधी गणेश दाणे ,लक्ष्मण वावरे, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे परशुराम साबळे आदींनी अभिनंदन  करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
     या कार्यकारिणीच्या कोपरगाव  तालुकाध्यक्ष पदी  मनिष जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव विनोद जवरे, शहर सह. सचिव अक्षय काळे, कार्यअध्यक्ष राजेंद्र जाधव, संघटक व प्रसिध्दी प्रमुख शिवाजी जाधव, संघटक लक्ष्मण जावळे, सह. संघटक फकिरराव टेके, सह. संघटक रविंद्र जगताप, शहर संघटक योगेश गायके यांची बिनविरोध  निवड करण्यात आली असल्याची  माहिती तालुकाध्यक्ष मनीष जाधव यांनी सांगितले.
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला पत्रकार संघ असुन पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नतीसाठी सदैव कटिबध्द असलेला संघ म्हणुन पत्रकार संघाने महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. राज्यातील प्रत्येक शहरासह ग्रामीण भागात पत्रकार संघाचे काम आजही चालु असुन कोपरगांव सारख्या एैतिहासीक शहर व ग्रामीण भागातील प्रश्न तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातुन काम व्हावे म्हणुन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केापरगांव तालुक्याची कार्यकारणी जाहिर करुन नवनिर्वाचित पदाधिकारींचे पत्रकारसंघाच्या वतीने अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.