Breaking News

रस्ता नव्हे ही तर गाडवाट, पढेगाव ते रेल्वे स्टेशन रस्त्याची अवस्था बिकट !

रस्ता नव्हे ही तर गाडवाट !
----------
पढेगाव ते रेल्वे स्टेशन रस्त्याची अवस्था बिकट !


कोपरगाव प्रतिनिधी -
कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागाला आणि वैजापूर शहराला दळणवळणासाठी जोडणारा महत्वाच्या मार्गावरील साडेपाच किलोमीटरचे शिंगणापूर पढेगाव रस्त्याचे काम बरीच वर्ष प्रलंबित राहिले होते.
डिसेंबर २०१४ला मंजुरी मिळालेल्या १ कोटी२१लक्ष रुपये मंजुरी असलेल्या पढेगाव-शिंगणापूर रस्त्याच्या कामाला सुरुवातीपासुन ग्रहण लागले होते. कसाबसा निकृष्ट दर्जाचा रस्ता त्यावेळी करण्यात आला.धातुर मातुर पुलांचे कामे झाली.निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकांच्या तक्रारींकडे कायमच कानाडोळा करुन काम उरकुन घेतले होते.त्यामुळे सध्या या मार्गाला रस्ता म्हणावं की गाडवाट असा प्रश्न सध्यातरी नागरीकांना पडला आहे.

पढेगाव शिंगणापूर या साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम करण्यास तत्कालिन ठेकेदारांनी विलंब लावल्यामुळे पुर्व भागातुन बांधकाम विभागाकडे बऱ्याच तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्यावर कोपरगाव बांधकाम विभागाचे संजय कोकणे यांनी संबंधित ठेकेदारांस प्रतिदिन दोन हजार रुपये दंड करुन ब्लॕक लिस्टमध्ये त्यांचा समावेश केला होता.त्यानंतर निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविण्यात आला.दोन वर्षाच्या आत या रस्त्याची परिस्थिती जैसे थे झाली.सध्या मेलेल्या जनावराचे मांस ओरबाडून हाडके उघडी पडावी तसे रस्त्यावरील डांबर नाहिशे होऊन खडीच उघडी पडलेली नाही तर गुडघाभर खड्ड्यांनी रस्ता व्याप्त असुन दैनंदिन ये जा करणाऱ्यांच्या दुचाकी चारचाकी खिळखिळ्या झाल्या असुन,यामुळे अस्थीविकारांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिक बोलत आहे.हा रस्ता सध्यातरी पुर्व भागातील नागरीकांना दैनंदिन डोकेदुखी ठरत आहे.याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्यास सध्यातरी कुठलीही मंजुरी नसल्याचे सांगत आहे.

माझा कोपरगावला व्यवसाय असुन,दैनंदिन कासली ते कोपरगाव प्रवास करावा लागतो रस्त्याने जाणे येणे नकोशे झाले असुन पर्यायी मार्गही उपलब्ध नसल्यामुळे मणक्यांचा त्रास जाणवु लागला आहे. रस्त्याचे काम करुन यापुर्वी निकृष्ट काम केलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करुन संबंधितांवर निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करुन चांगला रस्ता लवकरच तयार करण्यात यावा अन्यथा पुर्व भागातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल.
-------------
डॉ.कृष्णा मलिक,कासली ता.कोपरगाव