Breaking News

अकोल्यात आज १४ कोरोना रुग्णांची भर !

अकोल्यात आज १४ कोरोना रुग्णांची  भर !


अकोले/ प्रतिनिधी :
     काल शनिवारी ३२ कोरोना  पॉझिटिव्ह आढळल्या नंतर आज रविवारी अकोले  तालुक्यात नवीन १४ कोरोना  रुग्णांची भर पडली.!
रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ११ व खाजगी प्रयोगशाळेतील ३ अशी १४ व्यक्तीचा अहवाल आज पॅाझिटीव्ह आला.
     आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील ६० वर्षीय पुरुष,३० वर्षीय पुरूष , ५२ वर्षीय महिला,३२ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,इंदिरानगर येथील ३२ वर्षीय तरुण,महालक्ष्मी कॅालणीतील ६० वर्षीय महीला,३२ वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगी, ०२ वर्षीय मुलगा, ढोकरी येथील २५ वर्षीय तरुण अशी ११ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील शाहूनगर येथील ४० वर्षीय पुरुष,राजुर येथील ७२ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड येथील ५२ वर्षीय पुरूष अशा तिन व्यक्ती सह आज एकूण १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
  तालुक्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णसंख्या ८७४ झाली  असून बळींची संख्या १५ झाली आहे.
------