Breaking News

पाचव्या मजल्यावरून पडल्याने शिक्षकाचा मृत्यू !

पाचव्या मजल्यावरून पडल्याने  शिक्षकाचा मृत्यू !


कोल्हार प्रतिनिधी :
    पाचव्या मजल्यावरून पडल्याने प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हार येथे आज बुधवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान झुंबरलाल कुंकूलोळ व्यापारी संकुलात घडली 
याबाबत सविस्तर असे की ,कोल्हार बुद्रुक येथील निबे देवकर वस्ती वरील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले व येथील झुंबरलाल कुंकूलोळ व्यापारी संकुलात राहत असलेले प्राथमिक शिक्षक शरद गोरक्षनाथ तांबे (वय 47) हे बुधवारी दुपारी कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडले. 
त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला 
या घटनेसंदर्भात कोल्हार गावात दिवसभर उलट-सुलट चर्चेला उधान आले होते.
शरद तांबे यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुलं ,भाऊ, बहिणी असा परिवार आहे.