Breaking News

साबळे यांची विश्व शांतीदूत म्हणून निवड !

साबळे यांची विश्व शांतीदूत म्हणून निवड

करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था कासली चे संस्थापक अध्यक्ष परशराम रामनाथ साबळे यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मिशन च्या महाराष्ट्र मधून अंतरराष्ट्रीय विश्व शांती दूत म्हणून नुकतीच महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ राजकुमार टाक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
   साबळे यांच्या या निवडीबद्दल कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेन्टर, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेज कासली, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली च्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.