Breaking News

कर्जुले हर्या येथे तिघांना बेदम मारहाण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

कर्जुले हर्या येथे तिघांना बेदम मारहाण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


पारनेर प्रतिनिधी-
     तालुक्यातील कर्जुले हर्या येथे कारण नसतानाही आई-वडील पत्नी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद संजय राजू गावडे वय 25 राहणार कर्जुले हर्या यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्यावरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि 29 रोजी कर्जुले हर्या येथे आरोपी तानाजी भानुदास वाघ साहेबराव भानुदास वाघ बाळू शिवराम वाघ रमेश युवराज गांगुर्डे दोन नावे माहीत नाही सर्व राहणार कार्जुले हर्या तालुका पारनेर यांनी काही एक कारण नसताना फिर्यादीचे आई-वडील व पत्नी यांना धक्काबुक्की करून  लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व तसेच  राहुरी वरून आलेल्या  आरोपी  यांची तलवार  फिर्यादी यांची पत्नी तिच्या डाव्या हाताला  दुखापत केली आहे यात फिर्यादीची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे उपचार सुरू आहेत संजय राजू गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल शेलार करत आहेत.