Breaking News

नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी !

नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी.
----------
अकोले नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सभ्यतेचे प्रशिक्षण द्या-- प्रकाश साळवे
-----------


अकोले प्रतिनिधी :
     अकोले नगर पंचायतचे सर्व विभागाचे कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना अरेरावी करत असून त्यांना तत्काळ नागरिकांशी सभ्य भाषेत बोलण्याची समज देण्यात यावी असे निवेदन अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान चे अध्यक्ष व दलितमित्र प्रकाश साळवे यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत अकोले यांना दिले आहे.

     अकोले नगर पंचायतचे कार्यालयीन कर्मचारी कार्यालयात आलेल्या नागरिकांशी मग्रूर पणे बोलत असतात.नागरिक विविध दाखले,व कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात गेल्यानंतर कर्मचारी नागरिकांना योग्य माहिती देत नाही, नागरिकांशी उध्दटपणे बोलतात.असे अनेक प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे कर्मचारी वयोवृध्द माणसे व महिलांना विनाकारण तासन् तास बसवून ठेवतात.नागरिकांची कामे न करता व्हॉट्स ऍप व फेसबुक वर गप्पा मारण्यात दंग असतात. या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्याने नगर पंचायतचे कर्मचारी नगर पंचायतचे कार्यालय हे स्वतः ची खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत.

     कार्यालय कामकाजासाठी गोरगरीब,सर्वसामान्य लोक आल्यावर त्यांच्याशी दादागिरी ची भाषा काही कर्मचारी वापरत असल्याचेही निदर्शनास आले आले आहे.तसेच शहरातील धनदांडग्या लोकांची कामे मात्र हे कर्मचारी ताबडतोब करून देतात.तसेच श्रीमंत लोकांचे कागदपत्रे व दाखले घरपोच करतात व सामान्य नागरिकांना ताटकळत बसावे लागते अश्या प्रकारे कर्मचारी कामकाज करत असून त्यांना नागरिकांशी चांगल्या भाषेत बोलण्याची समज द्यावी अशी मागणी प्रकाश साळवे यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर,तहसीलदार अकोले  यांना दिल्या आहेत
------------