Breaking News

लोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण !

लोणी मावळ येथे पत्नीने शरीरसंबंधांला नकार दिल्याने पतीने केली बेदम मारहाण
-----------
अनेक वेळा पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय


पारनेर प्रतिनिधी -
तालुक्यातील लोणीमावळा येथे पत्नीकडे पतीने शरीरसुखाची मागणी केली पोटात दुखत असल्याने नकार दिला त्यामुळे पत्नी वर संशय घेत तिला बेदम मारहाण केली  पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणीमावळा येथील 23 वर्षीय महिलेला तिच्या पतीने शरीरसुखाची मागणी केली तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले त्यामुळे मला त्रास होत आहे  आराम करू उद्या असे म्हणाल्याचा राग आल्याने पती ने पत्नीस लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी पोटात पाठीवर हातावर पायावर मारहाण केली तसेच यापूर्वी वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली असल्याबाबत पत्नीने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यावरून आरोपी ताहीर चांद पठाण रा. लोणीमावळा याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.डी ए उजगरे हे करत आहेत.