Breaking News

प्रतिथयश व्यापारी सुमनभाई शाह यांचे निधन

 प्रतिथयश व्यापारी सुमनभाई शाह यांचे निधनश्रीरामपूर प्रतिनिधी :

येथील जुन्या पिढीतील प्रतिथयश व्यापारी, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व शाह ट्रेडिंग कंपनीचे मालक सुमनभाई  फकिरचंद शाह(वय-८५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून, जावई, नातु-,पणतू असा मोठा परिवार आहे.रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य, प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष ,अँड. रावसाहेब शिंदे शैक्षणिक प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष,विचार जागर मंच या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक सचिव होते.

शाह ट्रेडिंग कंपनीचे मालक संजय शाह यांचे ते वडील तर व्यापारी चंद्रकांतभाई व माजी नगरसेवक अशोकभाई शाह यांचे ते थोरले भाऊ होत.तसेच राजेश, पियुष, सुधीर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पराग शाह, व्यापारी ब्रिजेश शाह, गिरीश शाह, संदीप व राहुल शाह यांचे ते चुलते होत.