Breaking News

तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील धक्कादायक घटनेत दोन जण मयत !


तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील धक्कादायक घटनेत दोन जण मयत


पाथर्डी/प्रतिनिधी :
तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील हर्षदा खेडकर (वय २२वर्षे) या युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन तर नारायण खेडकर (वय ९० वर्ष) यांचा धुराने गुदमरून जीव गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली असुन पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
         याबाबत पोलिसांकडुन समजलेली अधिक माहिती अशी की,सदरील घटनेबाबत गावातील पोलीस पाटील यांनी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पाथर्डी पोलिसांना हर्षदा खेडकर हिने घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे.तसेच नारायण खेडकर हे शेजारील दुसऱ्या खोलीत मयत अवस्थेत आढळून आल्याचे कळवले.त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, त्या बिटचे हवालदार अजिनाथ बडे पोलीस कॉन्स्टेबल विजय सुपेकर यांनी भेट दिली.
संबधित मयत इसमाचे मृतदेह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले व सर्व वैद्यकीय तपासणी केली असता मेडिकल ऑफिसर यांनी संबधित ९० वर्षीय इसमाचा धुराने गुदमरून व युवतीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...