Breaking News

नगर - औरंगाबाद महामार्गावरील झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यु !

नगर - औरंगाबाद महामार्गावरील झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यु !

नेवासा फाटा येथे भाजीपाला घेवून जाणाऱ्या टर्बो टेम्पोचे चाक निखळून झालेल्या अपघातात युवकावर काळाचा घाला !


नेवासा तालुका प्रतिनिधी
        अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे नगरहून औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून जाणाऱ्या ४०७ टाटा टर्बो टेम्पोचे चालते चाक निखळून झालेल्या विचिञ अपघातात निखळलेले चाक सुमारे ७० फुटावर वेगाने धावत जावून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी होवून ठार झाल्याची दुर्देवी घटना गुरुवार (दि.३) रोजी राञी साडेआठ वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथील जगताप मिठाईवाले या दुकाणासमोर घडली.
       याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे,की नगरहून - औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून चाललेल्या टाटा टर्बो कंपणीचा ४०७ टेम्पो (क्रमांक एम.एच १२ एन् एक्स ६१५७) या टेम्पोचे भरधाव वेगात जात असतांना चाक निखळुन संदिप बाळासाहेब जोंधळे (वय ३३) या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने तो गंभीर जखमी झाला जखमीला नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करुन त्याला नगर येथे हलविण्यात आले असता या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे औषधोपचार करण्यापुर्वीच दुर्देवी निधन झाल्याने नेवासा शहरासह नेवासा फाटा परिसरात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.
      या अपघाताचे दुर्देवी वैशिष्ट म्हणजे नगरकडून - औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून जात असलेल्या टर्बो टेम्पोचे टायर टेम्पो रस्त्यावर भरधाव वेगात चालू आसतांनाच राजमुद्रा चौकात निखळले तरी हा टेम्पो सुमारे शंभर फुटावर आसणाऱ्या हॉटेल आकाश पर्यंत आला व तेथून हे टायर टेम्पोतून सुटून सुमारे ७० फुटावर रस्त्याच्या आडबाजूला दुकाणच्या आडोशाला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जावून आदळल्याने हा युवक गंभीर जखमी होवून त्याचा या अपघातात मृत्यु झाला. 
     विशेष म्हणजे या झालेल्या अपघातात टेम्पोचे डाव्या बाजूचे टायर निखळून उजव्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे महामार्ग पार करुन गेले अन् आडोशाला बसलेल्या संदिप जोंधळे या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने हा युवक गंभीर जखमी होवून या अपघातात त्याचा दुर्देवी अंत झाला या घटनेने नेवासा शहरासह नेवासा फाटा व परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दखल करण्याचे काम सुरु आसल्याची माहीती पोलिस सुञांनी दिली.

      या टेम्पोच्या झालेल्या अपघातात क्लिनरसाईडचे मागचे दोन्ही चाक निखळले या चाकाला सात ते आठ नट असतांना ते निखळलेच कसे किंवा कोणी नटबोल्ट ढिल्ले करुन टेम्पोचे नुकसान व्हावी म्हणून काही चाल खेळली की काय अशा एक ना अनेक चर्चेचे गुऱ्हाळ या अपघातानंतर सुरु झाले.