Breaking News

पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक, कुंपणच खातंय शेत !

 


यवतमाळ : जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपायाने अडीच हजारांची लाच मागितली. एसीबी पथकाच्या पडताळणीत या शिपायाने एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. नंतर संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. या शिपायाला लाच मागणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.


पुसद शहर पोलीस ठाण्यातील प्रशांत विजयराव थूल (३५, बक्कल नं.४२) असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. बोरी(खु) ता.पुसद येथील एका युवकाला जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी शिपायाने लाच मागितली. ही बाब १२ सप्टेंबरला एसीबी पथकाच्या पडताळणीत सिद्ध झाली. त्यावरून सोमवारी त्या शिपायाला एसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक हर्षराज अळसपुरे, निरिक्षक गजेंद्र क्षीरसागर, जमादार ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, वसीम शेख, राहुल गेडाम, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे यांनी केली.