Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात वीज कोसळून ६ शेळ्यांचा मृत्यू !

श्रीगोंदा तालुक्यात वीज कोसळून ६ शेळ्यांचा मृत्यू


येळपणे/प्रतिनिधी :-
     श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला असून येळपणे येथे शेतात वीज कोसळल्याने ६ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे . येळपणे शिवारात शनिवारी तुकाराम सोन्याबापू कोळपे हे शेळ्या चारण्यासाठी आपल्या शेळ्या घेउन गेले होते . त्यावेळी विजांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू झाल्याने काही शेळ्या झाडाखाली थांबल्या होत्या . पण झाडावर वीज कोसळल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. यातील काही शेळ्या लिंबाच्या झाडांखाली थांबल्या . तर त्यातील ६ शेळ्या लिंबाच्या झाडाखाली थांबल्या होत्या . त्यावेळी वीज पडून तुकाराम सोन्याबापू कोळपे या आठ गाभण शेळ्या व बिरू काळे यांच्या तीन गाभण शेळ्यांचा मृत्यू झाला. 
    त्यामुळे या शेळीमालकांवर उपासमारीची वेळ आली आहे . तसेच ह्या शेळ्या त्यांनी खाजगी पैसे काढुण विकत घेतल्या होत्या. या शेळीमालकाचे सरासरी दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . ही दुर्दैवी घटना घडल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .जनतेत नाराजीचा सुर ऐकावयास मिळाला.तसेच शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा या शेळीमालकांनी केली आहे. या घटनेची माहिती कळताच पशु वैद्यकीय विभागाचे डॉ. नितीन पवार व कामगार तलाठी एस. बी भांबरे, गणपत झाडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा पुर्ण केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दादा वीर ,उपसरपंच गणेश पवार, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कोळपे, शरद सोनवणे, राजेंद्र मोटे, रघुनाथ कोळपे,नितीन पवार,बापू साबळे आदी उपस्थित होते.