Breaking News

मोटरसायकल तुझ्या नावावर करून घे म्हणाल्याचा राग आल्याने केली बेदम मारहाण !

मोटरसायकल तुझ्या नावावर करून घे म्हणाल्याचा राग आल्याने केली बेदम मारहाण !


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील जवळा येथे मोटरसायकल तुझ्या नावावर करून घे हे म्हणाल्या चा राग आल्याने तिघांनी एकास बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवेश रोहिदास काळे वय 31वर्षे, धंदा शेती व मजुरी रा. जवळा ता. पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा भाचा ऋतीक लिंबाजी चव्हाण यास तुझी मोटारसायकल तुझ्या नावावर करुन घे असे म्हणाल्याचा राग येवुन आरोपी ऋतीक उर्फ खमीश लिंबाजी चव्हाण योगेश रामदास काळे आदेश योगेश काळे सुदेश योगेश काळे सर्व रा. जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी मोटारसायकलचा शाँक अपचा पाईप, लोखंडी राँड, काठी, तसेच लाकडी कुऱ्हाड घेवुन येवुन अवेश रोहिदास काळे याना मारहान केली मारहानीत त्याचा भाऊ योगेश याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीचे तंबुने डोक्यात मारुन जखमी केले तसेच सोडविण्या साठी आलेले भाचा राजु शरद भोसले व पत्नी शोभा अवेश काळे याना त्यांच्या हातातील हत्याराने मारहान करुन जखमी केले व तुम्ही जर परत माझे नादी लागले किंवा पोलिस स्टेशनला आमचे विरुद्ध तक्रार दिली तर कापुन टाकु अशी धमकी दिली याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली
पो ना एस व्ही गुजर करत आहेत.