Breaking News

चोंभूत येथे कांदा चाळ अज्ञातांनी पेटवली, लाखो रुपयांचे नुकसान !

चोंभूत येथे कांदा चाळ अज्ञातांनी पेटवली, लाखो रुपयांचे नुकसान ! 


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर तालुक्यातील कोरोना आजाराचे  महा संकट त्यात चोंभूत येथील एका शेतकऱ्याची अज्ञाताने कांदाचाळ येथून दिल्याबाबत ची घटना घडली आहे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान यामुळे झाले आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांनी फिर्याद दिली आह
लॉकडाउन मध्ये रखडलेला कांदा. आणि लॉकडाउन कुठे हटतो ना हटतो  तोच कांदा पिकाने दराच्या बाबतीत घेतलेला उचांक, मध्यंतरी निर्यात बंदीने शेतकऱ्याची अचानक झोप उडवली असताना या साऱ्या कांद्याच्या घडामोडींवर मात करत चोंभूत येथील शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी पैशाच्या आशेपोटी कांदा राखून ठेवला होता मात्र क्रूर प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी त्यांचा कांदा दि. 30 रोजी मध्यरात्री पेटवून दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर कांदा चाळीत सुमारे 300 गोणी इतका कांदा होता. साधारण 100 गोणी कांदा जळून खाक झाल्याने आत्ताच्या बाजार भावाप्रमाणे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चोंभूत परिसरात अश्या मनोवृत्तीचा जाहीर निषेध होत आहे.
        या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता तातडीने घटनास्थळी भेट घेऊन. झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.तसेच पारनेर पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.


साडेचार लाखांना दिला होता कांदा.
    शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी 3 दिवसांपूर्वी कांदा चाळ ही कांदा व्यापाऱ्याला साडेचार लाख रुपयांना दिला होता.मात्र हातात पैसे पडण्याआधीच अज्ञात इसमांनी कांदा चाळ पेटवून दिल्याने बरकडे यांना मोठा आर्थिक फटाका बसला आहे.