Breaking News

निघोज येथे सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली मुलानेच केला मित्रांच्या मदतीने बापाचा खून !

निघोज येथे सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली मुलानेच केला मित्रांच्या मदतीने बापाचा खून !
-----------------
आईला योग्य वागणूक देत नसून वडीलाचे असणारे अनैतिक संबंध यामुळे मुलाने केला बापाचा खून!


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरामध्ये २७ ऑगस्ट रोजी अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून या व्यक्तीचा त्याच्याच मुलाने मित्रांच्या मदतीने खून केला असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे वडील आईला त्रास देत असल्याचे कारण व वडिलांचे असणारे अनेतिक संबंध यातून हा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे . 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
 निघोज, ता-पारनेर येथील खूनाचे रहस्य उलगडले,पारनेर पोलीस स्टेशनची कारवाई दि. २७ ऑगस्ट रोजी १५:३० वा. चे सुमारास कुकडी नदी पात्रात कुंड परिसर, निघोज, ता पारनेर, जि- अहमदनगर येथे एका पत्र्याचे धान्याचे कोटीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत, वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे हा मयत स्थितीत मिळून आला. त्यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात हत्याराने मारुन प्रेत पेटीत घालून
पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात टाकून दिले. त्याबाबत फिर्यादी श्री. दामू धोंडीबा घोडे, वय- ४४ वर्षे, धंदा-शेती माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता- शिरुर, जि- पुणे यांनी दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात अनोळखी इसमाचा, कोणीतरी अज्ञात इसमांनी, कोणत्यातरी हत्याराने खून केला व मयतास जिवे ठार मारले. मारेकऱ्याने कसलाही पुरावा घटनास्थळी राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली होती. घटनेचे
गांभिर्य ओळखून घटनास्थळी तात्काळ  अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर, दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर,राजेश
गवळी, सपोनि पारनेर पो.स्टे. यांनी श्वान पथक, फिंगर प्रिन्टतज्ञ, सायबर तज्ञ पथकातील कर्मचाऱ्यासह भेट दिली.
वरिष्टांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे, मयातचे व त्याचे सोबत मिळून आलेल्या वस्तूंची शोध पत्रीका व तपास याद्या
तयार करुन पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा स्तरावर वेगवेगळे पथके तयार करुन घटना ठिकाणचे परिसरात, लगतचे गावामध्ये, एमआयडीसी भागात जावून माहीती संकलीत करण्यात आली.तपासा दरम्याण दि. ११ रोजी रांजणगांव एमआयडीसी पो.स्टे. शिरुर, जि- पुणे येथे मयताचे वर्णनाशी मिळती-जूळती मिसींग दाखल झाले बाबत माहीती प्राप्त झाल्याने तपास पथकातील पोउनि बोत्रे,पोशि दिवटे, चौगुले अशांनी रांजणगांव एमआयडीसी पो.स्टे. येथे जावून माहीती घेतली असता दि. ८सप्टेंबर रोजी सतिष सदाशिव कोहकडे, वय- ४ ९ वर्षे, रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे हा दि. २५ ऑगस्ट रोजी
पहाटे पासून मिसींग झाले बाबत मिसींग रजि. नोंद असल्याने त्यांनी लागलीच मयताचे नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना मयताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखविले असता मयताचे नातेवाईकांनी मयत हा मिसींग व्यक्तीच असल्याचे खात्रीलायक सांगीतले. मयताची ओळख पटविणे कामी मयताचे राखून ठेवलेले शारिरीक घटक तसेच नातेवाईकांचे DNA चाचणी नियोजन करण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कारेगांव येथील तांत्रीक व गोपनिय बातमीदाराचे माहीती वरुन मयाताचे मृत्यू बाबत त्याचे मुलाकडे सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातील मयताचे मुलाने टाळाटाळ केली, परंतू त्याचेकडे अधिक कसून चौकशी करता त्याने वडील आईला योग्य वागणूक देत नसल्याने व घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे वडील त्यांचे अनैतिक संबध असलेल्या दुसऱ्या महीलेवर खर्च करतात, यावरुन त्याचे आपले वडीलांशी नेहमी वाद होत होते. दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी १ ९: ३० वा. चे सुमारास त्याचे वडीलाचे अनैतिक संबधाच्या कारणावरुन वाद होवून आईला मारहाण केल्याचा राग ठेवून मयताचा त्याचा मुलगा प्रदीप सतिष कोहकडे, रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे याने त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे,श्रीकांत बाळू पाटोळे, दोन्ही रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे आणि त्याचे इतर दोन अल्पवयीन साथीदार यांचे मदतीने मयताचे राहते घरामध्ये त्याचे डोळ्यामध्ये मिरची पुड टाकून तोंड दाबून कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे प्रेत निळे रंगाचे मारुती ८०० या कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहते पाण्यामध्ये टाकून दिले व त्यानंतर बनाव रचून मयताची कार ही शिरुर तालूक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीमध्ये सोडून दिल्याची कबुली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश गवळी हे करत आहेत.
याकामी सपोनि वाघ, पोसई पदमने, पोसई बोत्रे, पोहेकॉ जाकिर शेख निकम, पोकॉ  दिवटे,चौगुले, खाडे, पाचारणे, शिंदे, राठोड यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.