Breaking News

कोरोना मुळे प्रवाशांची "लालपरी" बनली मालवाहतूक ट्रक !

एस.टी. प्रवाशांविना करत आहे माल वाहतूक.

कोरोना मुळे प्रवाशांची "लालपरी" बनली मालवाहतूक ट्रक.

कोरोना संकटातून आर्थिक बळकटी मिळण्यासाठी एसटी ची धडपड.


शशिकांत भालेकर/पारनेर -
    ग्रामीण भागाबरोबरच शहरात सर्वसामान्य प्रवाश्यांची लाडक्या समजल्या जाणाऱ्या लालपरीला कोरोना मुळे मोठा फटका बसला आहे महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीची धडपड सुरू आहे कोरोना मुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नाही त्यामुळे पारनेर एसटी महामंडळाच्या तीन बसला मालवाहतूक गाडी मध्ये रुपांतर करण्यात आले आहे कोरोना मुळे एसटी महामंडळ सध्या तोट्यात आहे कोरोना काळामध्ये प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद मिळत नाही त्यातच शासनाच्या नियमाप्रमाणे पन्नास टक्केच प्रवासी बसमध्ये वाहतूक करण्यात येत आहे त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात जात आहे तसेच अनेक बसेस बंद असल्याने हा तोटा वाढत आहे तो भरून काढण्यासाठी महामंडळाने राज्यभर मालवाहतूक करण्यासाठी ठराविक एसटी बसेस तयार करण्यात आल्या आहेत.
    पारनेर डेपो ने जुलैपासून मालवाहतूक सेवा सुरू केली सुरुवातीच्या काळामध्ये त्यासही अत्यल्प प्रतिसाद मिळाला मात्र सध्या या मालवाहतूककेला चांगला प्रतिसाद मिळत आहे पारनेर आगारातील एकूण ५३ एसटी बसेस पैकी तीन बस चे रूपांतर मालवाहतूक ट्रक मध्ये करण्यात आले आहे गरजेनुसार अजूनही या ट्रकची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली आहे.
    एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचे ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले यामध्ये बसचे मागील सर्व सिट काढून मालभरण्यासाठी मागे एक दरवाजा बसवण्यात आला आहे ज्या ठिकाणी खिडक्या होत्या तिथे पत्रा मारला गेला आहे त्यामुळे बसमध्ये पाणी वगैरे येणार नाही व आतील माल भिजणार नाही तसेच बस च्या वरूनही कागदाचे आवरण बसवण्यात आले आहेत.
    या मालवाहतूक बस मध्ये पशुखाद्य कोंबडी खाद्य लोखंडी सळई कांदे आदी शेतमाल नाशवंत वस्तू सोडून सर्व प्रकारचे भाडे या बससाठी घेतले जात आहे ही मालवाहतूक राज्यांतर्गत कुठेही केली जाते ह्या भाड्याचा दर ४० ते ४५ रुपये किलोमीटर प्रमाणे आकारला जातो जेवढ्या रुपयाचा माल गाडीमध्ये असतो त्या प्रमाणे एक लाखाला दोनशे पन्नास रुपयाचा अधिभार वेगळा घेतला जातो या बसमध्ये दहा टनापर्यंत मालवाहतूक केली जाते नियमित प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मध्ये बदल करून मालवाहतूक ट्रक तयार केला आहे कोरोना महामारी मुळे एसटीच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाला आहे आर्थिक फटका सर्वात जास्त बसल्याने मार्च पासून मे पर्यंत सर्व प्रकारच्या बसेस बंद होत्या आता ही प्रवासी वाहतूक बस मध्ये करण्यात येते मात्र ती मर्यादित आहे प्रवाशांचा सध्या बसला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून एसटीने मालवाहतूकिला सुरुवात केली आहे.

 पारनेर डेपोला मालवाहतूक साठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ऑगस्ट मध्ये २२ भाडे करण्यात आले आहेत तर २५ भाडे दुसर्‍या डेपो च्या गाडीना देण्यात आले आहे. पुढील काळात सुरळीत प्रवाशी वाहतूक सुरू झाली व त्यासोबत एसटीने ही माल वाहतूक सुरू ठेवली तर झालेला तोटा कमी होण्यास मदत होईल.
-----------
 पराग भोपळे
आगार व्यवस्थापक पारनेर