Breaking News

पारनेर तालुक्यांमध्ये आज ३२ अहवाल पॉझिटिव्ह, २७ निगिटीव्ह, शासकीय लॅबचे ७४ अहवाल प्रलंबित !

पारनेर तालुक्यांमध्ये आज ३२ अहवाल पॉझिटिव्ह, २७ निगिटीव्ह, शासकीय लॅबचे ७४ अहवाल प्रलंबित !
----------
पारनेर तालुक्यात कोरोनाने आज तिघांचे मृत्यू !
----------
कोरोना चे लक्षणे दिसतात त्वरित चाचणी करा वेळकाढूपणा करू नका तहसीलदार ज्योती देवरे.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्‍यात आज दि ५ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ३२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
 कोरोनाने तालुक्यातील तिघांचा मृत्य झाला आहे यात निघोज  शिरापूर गुणोरे  या गावातील व्यक्तीचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये राळेगण थेरपाळ ८ पठारवाडी ४ वडगाव सावताळ ४ कान्हूरपठार २ गोरेगाव १ गुणोरे २ पिंपळनेर १ नांदूर पठार १ देवीभोयरे १ वाडेगव्हाण १ जवळा १ निघोज १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
   तर तालुक्यातील २७ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत यामध्ये पारनेर शहर ७ निघोज ५ जवळा ३ टाकळी ढोकेश्वर ३ सोबलेवाडी १ कान्हूर पठार ६ सारोळा अडवाई १ लोणी हवेली १ गांजीभोईरे १ सुपा १ पुणेवाडी १ भाळवणी १ राळेगण थेरपाळ १ या गावांचा निगिटीव्ह अहवालात मध्ये समावेश आहे.
तर तालुक्यातील शासकीय लॅबला कोरोना संशयित व्यक्तींचे घशाचे स्राव घेतले त्यातील ७४ अहवाल येणे बाकी आहे.
    तर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने सध्या रुग्ण संख्याही वाढली आहे त्यामुळे अनेक वेळा वेळीच कोरोनाचे निदान न झाल्यामुळे रुग्णांची परिस्थिती चिंताजनक बनले व त्यात काही रुग्ण दगावले देखील आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी आवाहन केले आहे की कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येताच त्वरित पारनेर लेडीज होस्टेल येथे आपली स्राव तपासणी करून घ्यावी कुठलाही लपाछपीचा प्रकार करू नये ही गोष्ट सर्वांनी स्वीकारायला हवी लवकर उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो त्यामुळे कोणीही कोरोना बाबत वेळकाढूपणा करू नये लक्षणे दिसताच त्वरित आपली चाचणी करून घ्यावी त्यामुळे आरोग्य विभागाला उपचार करणे सोयीचे जाईल असे तहसीलदार यांनी सांगितले.
    पारनेर तालुक्यातील ज्या गावातील ज्या भागात आज कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत ते रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.