Breaking News

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेचे अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक !

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेचे अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक !
--------------
पोलीस भरतीपूर्व व्हर्च्युअल प्रशिक्षणाचा पॅटर्न भरतीनंतर शासन अवलंबणार !
---------------
 गृहमंत्र्यांच्या  हस्ते 'खाकी' अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन !
--–---------
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डिजिटल अकॅडमीद्वारे पंचवीस हजार उमेदवारांना मोफत मार्गदर्शन !


पारनेर प्रतिनिधी -
 गृह विभागाकडून या वर्षाच्या शेवटी साडेबारा हजारांपेक्षा जास्त जणांची पोलीस भरती करण्यात येणार आहे.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल ॲकॅडमी बंद आहेत. याला पर्याय म्हणून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली व्हर्च्युअल अकॅडमी सुरू करण्यात आली आहे.या साठी तयार करण्यात आलेला खाकी' अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्या हस्ते बुधवारी  करण्यात आले. ही सिस्टीम भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा वापरता येणार असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.या माध्यमातून राज्यातील तरुण-तरुणींना तीन महिने मोफत अत्याधुनिक स्वरूपाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.या अभिनव उपक्रमाबद्दल पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर गृहमंत्र्यांनी कौतुकाची थाप मारली.
       राज्य पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गृह विभागाने पाऊल उचलले आहे.दरम्यान साडेबारा हजार जणांची नव्याने पोलीस भरती करण्यात येणार आहे. जिल्हा आणि पोलीस आयुक्तालय निहाय जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी अर्ज सुद्धा उमेदवारांनी भरलेले आहेत.मात्र कोरोना या वैश्विक संकटामुळे भरती प्रक्रिया होऊ शकले नाही.परंतु  डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून गृह विभागाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. अशा प्रकारची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेली आहे. पोलीस खात्यात येण्याचे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी सरावाची आवश्यकता असते त्याचबरोबर मार्गदर्शनही लागते.राज्यात भरतीपूर्व सरावासाठी अनेक खाजगी अकॅडमी आहेत.तेथे उमेदवारांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षणार्थी तरुण- तरुणींकडून शुल्कही आकारले जाते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी बंद आहेत.त्यामुळे तरुण-तरुणींना याठिकाणी प्रशिक्षण घेता येत नाहीत.
        फिजिकल अकॅडमी टाळेबंदीत  असल्याने आमदार निलेश लंके यांनी पोलीस भरती व्हर्च्युअल अकॅडमी सुरू करण्याची संकल्पना मांडली. अर्थात त्यांना त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचे सहकार्य मिळाले.निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला. त्यानुसार राज्यातील पहिली डिजिटल पोलीस भरती अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवारांना एक रुपया न घेता मोफत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. गृहमंत्र्यांचा दालनात बुधवारी या व्हर्च्युअल अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार निलेश लंके, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड,निलेश लंके प्रतिष्ठान चे राज्य सचिव अॅड राहुल झावरे,निघोजचे सरपंच ठकाराम लंके, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शिर्के,कारभारी पोटघन,विजय औटी, मुंबई प्रतिष्ठानचे गोविंद साबळे,संदेश घोगरे, गोकुळ शिंदे,संदीप पोटघन उपस्थित होते.

 गृहमंत्री अनिल देशमुख झाले प्रभावित 
--------------
     आमदार निलेश लंके आणि संदीप गुंड यांनी या संपूर्ण उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती दिली.'वेलडन' म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कोरोना संकटात सुरू करण्यात आलेली  ही डिजिटल अकॅडमी नक्कीच उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर भरतीपूर्वच नाही तर भरती झाल्या नंतरही प्रशिक्षणार्थींना अशा पद्धतीने प्रशिक्षण देता येऊ शकते.या यंत्रणेचा अवलंब गृह विभाग पुढे करेल असेही  देशमुख यांनी सांगितले.

 अशी आहे पोलीस व्हर्च्युअल अकॅडमी!
---------
पोलीस भरती अकॅडमी या सॉफ्टवेअर वर मार्गदर्शन
लाईव्ह लेक्चर साठी अत्याधुनिक डिजिटल स्टुडिओ ची सुविधा लेखी परीक्षेसाठी सर्व विषयांवर अनुभवी शिक्षकांचे ऑनलाइन मार्गदर्शन सर्वांसाठी नियमित ऑनलाईन चाचणी दर्जेदार डिजिटल नोट्स व संदर्भ साहित्य पोलीस अधिकारी व तज्ञांचे विशेष मार्गदर्शन शारीरिक फिटनेस व मैदानी तयारी तयारीसाठी विशेष मार्गदर्शन.

 पोलीस दलात भरती होण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी संबंधितांना योग्य आणि उत्तम मार्गदर्शक तसेच प्रशिक्षण मिळावे याकरता व्हर्च्युअल पोलीस अकॅडमी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.  गृहमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 25000 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. आतापर्यंत दहा हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. कोरोना  संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती होऊ इच्छिणाऱ्यांना ही अकॅडमी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचे याकामी बहुमोल सहकार्य मिळाले.
-------------
निलेश लंके
आमदार पारनेर नगर