Breaking News

यूएस ओपनमध्ये सुमित नागलचा ऐतिहासिक विजय !


भारत के सुमित नागल अमेरिकी ओपन क्वालीफायर के आखिरी दौर में - nangal in the  last round of the us open qualifier - Punjab Kesari

न्यूयॉर्क : 

भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता.  

यूएसचा प्रतिस्पर्धी ब्रॅडले क्लान याला मंगळवार 1 सप्टेंबर रोजी पराभवाची धूळ चारत नागलने यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. 6-1, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये सुमित नागलने विजय मिळवला. अवघ्या 23 वर्षांचा सुमित गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

नागलने क्लानविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 असा धमाकेदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये, क्लानने नागलवर मात केली आणि सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला. त्यानंतर सुमितने पुन्हा चौथ्या सेटमध्ये बाजी मारत 6-1 अशी आघाडी मिळवली.

जागतिक क्रमवारीत 122 व्या क्रमांकावर असलेल्या नागलचा यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल.

कोण आहे सुमित नागल?

सुमित नागलने गेल्याच वर्षी यूएस ओपनमधून ग्रँडस्लॅमच्या विश्वात पाऊल ठेवलं होतं. ग्रँडस्लॅमच्या पदार्पणातच त्याने टेनिस सम्राट रॉजर फेडररच्या नाकी नऊ आणले होते. या सामन्यात पहिला सेट जिंकत सुमितने फेडररच्या वर्चस्वाला धक्का दिला. सुमितने त्यावेळी फेडररला अक्षरशः घामटं फोडलं होतं. मात्र नंतरच्या तीन सेट्समध्ये सुमितला कडवी झुंज देत फेडररने सामना खिशात घातला होता. फेडररविरोधात एखादा सेट जिंकणारा सुमित हा पहिलाच भारतीय ठरला होता.