Breaking News

कोरठण खंडोबा मंदिरातील चांदीच्या पादुकांच्या चोरीची आरोपीने दिली कबुली!

कोरठण खंडोबा मंदिरातील चांदीच्या पादुकांच्या चोरीची आरोपीने दिली कबुली!
-------------
चोरीचा तपास लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिनंदन!


पारनेर प्रतिनिधी- 
 पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा येथे मंदिर परिसरातील आवारामध्ये चांदीच्या पादुका चोरांनी चोरून नेले होते याप्रकरणी पोलिसांनी तपास लावला यात आरोपीला अटक केली असून चोरीला गेलेल्या पादुका पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत यामुळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी सर्व पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहे.


महाराष्ट्रातील राज्यस्तरीय ब वर्गात समावेश असणारे व लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील मंदिरासमोर च्या चांदीच्या पादुका दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजता दोन चोरांनी चोरून नेले होते त्यानंतर राहता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरातील चांदीच्या मौल्यवान मूर्ती च्या झालेला धाडशी चोरीचा तपास लावताना पोलिसांना कोरठण खंडोबा येथील चोरीला गेलेल्या पादुकांच्या चोरीचाही तपास या चोराकडे लागला आहे. 
आरोपी भास्कर खेमाजी पथवे, वय- ४२ वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता- संगमनेर यास ताब्यात घेतले. त्यास जंगलामधून बाहेर आणून
विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याचेसांगीतले. त्यावरुन साथीदार आरोपीचा शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. 
 यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी दि. १८ पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
दोन्ही मंदिरातील मौल्यवान चांदीच्या ऐवजांची चोरी करणाऱ्या चोराला जेरबंद केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे तसेच पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे आदींचे देवस्थान ट्रस्टच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चोरलेल्या चांदीच्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता आरोपीने त्याचे नांदुरी दुमाला येथील शेतामध्ये लपवून ठेवलेले विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट, पादूका व कोरठण खंडोबा मंदिरासमोरील पादुका इतर चांदीचे दागिणे काढून दिल्याने ३,८५,२००रु.किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह राहाता पो.स्टे. ला हजर करण्यात आलेलेअसून पुढील तपास राहाता पो.स्टे. हे करीत आहेत.