Breaking News

माझ्या वाहनांवरच का गुन्हा दाखल करता? असे म्हणत वाळू तस्करांचा तहसीलदारांच्या दालनात आत्मदहन करण्याचा प्रयत्न !

माझ्या वाहनांवरच का गुन्हा दाखल करता? असे म्हणत वाळू तस्करांचा तहसीलदारांच्या दालनात आत्मदहन करण्याचा प्रयत्न !


 नेवासा तालुका प्रतिनिधी :
     नेवासा तहसिलदार नेहमीच आपल्या वाहनावर अवैध वाळू वाहतूकीचा गुन्हा दाखल करत असल्याचा संशय मनात धरुन एका वाळू तस्करांने थेट तहसिल कार्यालयात जावून तहसिलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (दि.४) रोजी सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली.
   याबाबत अधिक सविस्तर अधिक वृत्त असे, की शुक्रवारी दुपारी  तीन वाजेच्या सुमारास तहसिलदार रुपेशकुमार सुराणा,मंडलाधिकारी सुनिल लवांडे,नेवासा खुर्दचे कामगार तलाठी बी.एन् कमानदार, सरकारी वाहन चालक संतोष पडोळ असे महसूलचे पथक नेवासा चिचबन रस्त्यावर अवैद्ध गौण खनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आसतांना समोरुन एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो (क्रमांक एम.एच ०४ एफ.डी.८२७८) वाळूची अवैध वाहतूक करतांना तहसिलदार व पथकाला मिळून आला यामध्ये दोन ब्रॉस वाळू असल्याने या वाहनाचा पंचनामा करुन वाहन तहसिल कार्यालयामध्ये आणण्यात आले. त्यामुळे दत्ताञय आसाराम हिवरे (रा.नेवासा खुर्द) या वाळूतस्कराचा चांगलाच पारा चढला व त्याने थेट तहसिल कार्यालयात रॉकेलचा ड्रम घेवून तहसिलदारांच्या दालनात प्रवेश केला तुम्ही दुसऱ्या वाहनांवर कारवाई न करता माझ्याच वाहनावर कारवाई करता असे म्हणत रॉकेल अंगावर घेवून काडी लावण्याचा प्रयत्न करताच तहसिल कार्यालयातील कर्मचारी शिपाई बंडोपंत सोनवणे,वाहन चालक संतोष पडवळ,लिपीक ओम खोपसे यांनी आत्महत्या करणाऱ्या दत्ताञय हीवरे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व मंडलाधिकारी सुनिल लंवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून हिवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


दत्ताञय आसाराम हिवरे या वाळू तस्कराला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी सन २०१८ मध्ये २ लाख ५० हजार ९२५ रुपयांचा दंड करण्यात आलेला होता व माझ्यावरच महसूल विभाग कारवाई करतो व इतरांवर का नाही त्यामुळे आपण आत्महत्या करुन आपली जिवनयाञा संपविण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने यावेळी पोलिस ठाण्यात बोलतांना सांगितले.