Breaking News

मनोज पाटील नगरचे नवे पोलीस अधीक्षक !

मनोज पाटील नगरचे नवे पोलीस अधीक्षक !


अहमदनगर/प्रतिनिधी : 
      नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या सहाच महिन्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना अहमदनगर साठी नियुक्ती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी २ एप्रिल रोजी नगरचा पदभार घेतला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात चांगले काम होईल, अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरून हजर झाल्यापासून ते कायम निष्क्रिय राहिले. त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून महापालिकेत त्यांच्या पत्नीला आरोग्य विभागात दिली गेलेली नियुक्ती चर्चेचा विषय होऊन काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रारी केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. अखिलेशकुमार सिंह हे पहिल्या दिवसापासून नगरमध्ये निष्क्रिय ठरत आले. सर्वात कमी
कालावधीत बदली झाल्याचे रेकॉर्ड पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांचे झाले.