Breaking News

नाफेडमार्फत कृषि उत्पन्न बाजार समिती,पारनेर येथे मुग व उडीद खरेदी केंद्र मंजुर - सभापती प्रशांत गायकवाड

नाफेडमार्फत कृषि उत्पन्न बाजार समिती,पारनेर येथे मुग
व उडीद खरेदी केंद्र मंजुर - सभापती प्रशांत गायकवाड
------------
ऑनलाईन नोंदणी नंतर माल खरेदी केला जाणार


पारनेर प्रतिनिधी - 
नाफेड मार्फत शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती, पारनेर येथे मुग व उडीद खरेदी केंद्र चालु होत असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.सन २०२०-२०२१ वर्षामध्ये आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत शासनाने मुग या शेतमालासाठी प्रति क्विंटल आधारभूत किंमत रुपये ७१९६ व उडीद या शेतमालासाठी प्रति क्विटल आधारभूत किंमत रुपये .६००० ठरविलेली आहे.तरी शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.तसेच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाळवून काडी कचरा विरहीत मुकणी विरहीत, इतर धान्य व दगड माती विरहीत स्वच्छ करुण आणावा.सदरचे शेतमालाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषि उत्पन्न बाजार समिती, पारनेरचे कार्यालयात दि .१५ पासुन सुरु करण्यात येत आहे.ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मुग व उडीद या पिकाची नोंद असलेला तलाठी स्वाक्षरी तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक खाते नंबर, आयएफसी कोड ठळक नोंद असलेले झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर आणुन ऑनलाईन नोंदणी करावी.ऑनलाईन नोंदणी नंतर माल खरेदी बाबत शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात येईल.त्यानंतर नाफेडच्या ग्रेडरने स्विकारलेला माल खरेदी करण्यात येईल व तद्नंतर नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन
शेतमालाची रक्कम जमा करण्यात येईल.तरी या योजनेचा पारनेर तालुक्यातील मुग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अहवान उपसभापती विलास झावरे व संचालक मंडळाने केले.