Breaking News

आदिवासी समाजाविषयी अपशब्द वापरणाऱ्या कॅलर्स टीव्ही च्या निर्मात्या व कलाकारांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल करावा-अमित आगलावे

आदिवासी समाजाविषयी अपशब्द वापरणाऱ्या कॅलर्स टीव्ही च्या निर्मात्या व कलाकारांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल करावा-अमित आगलावे
----------
भारती सिंग या स्त्री कलाकाराने वापरले अपशब्द
----------
खतरा खतरा खतरा या हिंदी कार्यक्रमात घडला प्रकार


करंजी प्रतिनिधी-:
    दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी कलर्स चॅनल वरील खतरा खतरा खतरा या मालिके मध्ये महिला ऍक्टर भारती सिंग ने आदिवासी समाज बदल आक्षेपार्ह  वक्तव्य केल्याने समस्त आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याने या स्त्री कलाकारांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन आज २८ सप्टेंबर रोजी कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे   यांना आदिवासी कोळी समाजाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अमित आगलावे यांनी दिले.
      हिंदी कलर्स चॅनलवर प्रसिद्ध होणाऱ्या खतरा खतरा खतरा या मालिके मध्ये भारती सिंग ह्या स्त्री ने आदिवासी समाज बदल आक्षेपार्ह वक्तव्य केले यात त्यांनी  ये आदिवासी लोग ही ऐसा कच्चा पहनते होगे ऐसावाला असे म्हणत आक्षेपार्ह शब्द वापरत अश्लिल कृती करत आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे त्या मुळे कलर्स चॅनल व भारती सिंग ह्या कलाकार वर अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र मुंबई येथील  विलेपार्ले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणोरे साहेब ,पोलीस निरीक्षक मांडवे मॅडम यांना  पोस्टा द्वारे पाठविण्यात आले.