Breaking News

ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !पाथर्डी/प्रतिनिधी :
   येथील बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाईन इंग्रजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Online Education and Traditional Education तसेच Contribution of Technology in Education या विषयावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन निबंध मागविण्यात आले. सध्याची शिक्षणाची अवस्था पाहता सदर निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. निबंधांचे परीक्षण केले असता विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षण गरजेचे असले तरीही त्याला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड असावी असे मत व्यक्त केले.

 सदर निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत निर्हाळी प्रणाली हिने प्रथम, शेख अर्शिया हिने द्वितीय तर झेंडे जिया हिने तृतीय क्रमांक मिळविला

स्पर्धेचे आयोजन प्रा. मन्सूर शेख यांनी तर परीक्षण प्रा. सचिन पालवे यांनी केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे व पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.