Breaking News

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आजपासूनकोविड विद्यार्थी-पालक अभियान :- जिल्हाउपाध्यक्ष कर्नावट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आजपासूनकोविड विद्यार्थी-पालक अभियान :- जिल्हाउपाध्यक्ष कर्नावट


अहमदनगर/प्रतिनिधी :
      राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आजपासूनकोविड विद्यार्थी-पालक अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोना विषाणू ला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या  पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनिल भाऊ गव्हाणे , जितेश सरडे व जिल्हाअध्यक्ष गजानन भाऊ भांडवलकर यांनी अभियानाच्या माध्यमातून करत आहोत. 
    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा कार्यकर्ता या नात्याने आपण सर्वांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा व्हावे.  कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना सोडून हे जग सोडून गेले त्या आपल्या विद्यार्थी मित्रांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात आपण द्यायला हवा हि सामाजिक जबाबदारी समजून घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या अभियानात सामील होत जास्तीत जास्त विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश करणार आहे अशी माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष प्रसाद कर्नावट  यांनी सांगितली.