Breaking News

दिशा सालियनवर पार्टीतच सामूहिक बलात्कार

 - आत्महत्या नव्हे खून?

मुंबई/ प्रतिनिधी 

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने खळबळजनक खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे खळबळजनक वक्तव्य त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने म्हटले आहे.

पार्टीमध्ये एकूण सहाजण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चारजणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती, अशी धक्कादायक माहितीही त्याने दिली. दिशाचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला होता. हा खूनच असल्याचा संशय व्यक्त होत होता.