Breaking News

वाडेगव्हाण फाटा येथील एका कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात !

वाडेगव्हाण फाटा येथील एका कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात !
------------
दूषित वायू व केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील जमिनी नापीक होण्याची भीती.
------------
उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची भूमिका संशयास्पद !


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे असणाऱ्या कंपनीमुळे शेजारील शेतमालाचे तसेच परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगर यांच्याकडे एक महिन्यापूर्वी लेखी अर्ज केला आहे मात्र अद्यापही त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली नाही मात्र या कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतजमीन फळबागा व आरोग्य धोक्यात आल्याने शेतकरी हैरान झाले आहेत.
    पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे गट नंबर ६१६ मध्ये क्राफ्टेड सोल्युशन या नावाची कंपनी जानेवारी २०२० मध्ये चालू झाली कंपनी सुरू झाली मात्र जवळच असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे कंपनी लगतच्या शेत जमिनी मध्ये वेगळ्या प्रकारच्या फळबागा असून त्यामध्ये प्रामुख्याने सीताफळ डाळिंब संत्री या भागांचा समावेश आहे मात्र या कंपनीच्या प्रदूषणामुळे फुलांची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे कंपनी मधून निघणारे सांडपाणी हे केमिकल युक्त असून त्याचा परिणाम जवळ असणाऱ्या विहिरी बोरवेल यांच्यावर होत आहे हे विहिरी बोरवेल चे पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कंपनीतून निघणार्‍या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्याचा फळबागा व इतर शेतमालावर विपरीत परिणाम होत आहे.
    कंपनीच्या बॉयलर मधून बाहेर पडणाऱ्या दूषित वायूंमुळे परिसरात नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांचे फळबागांचे लाखो रुपयाचे नुसकान भरपाई कोण देणार कृषी विभागाने पंचनामे केले मात्र पुढे काहीच नाही धुरामुळे डाळिंबाच्या पानावर थर साचत आहे शेतकऱ्यांनी या भागांमध्ये शेती करायची कशी भविष्य मध्ये या प्रदूषणामुळे व दूषित केमिकलयुक्त पाण्यामुळे जमिनी नापीक होण्याचा धोका आहे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे या प्रदूषण व केमिकल मुळे भविष्यात नागरिकांना शारीरिक व्याधी चा सामना करावा लागू शकतो याला जबाबदार कोणाला धरायचे याकडे उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच भूमिका का घेत नाही या कंपनीला या परिसरामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी परवानगी दिली कशी तसेच शेतकऱ्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने का घेत नाही असे अनेक सवाल येथील शेतकरी विचारत आहेत या समस्या बाबत अनेक ठिकाणी पाठपुरावा केला परंतु अद्याप न्याय मिळत नाही आम्ही न्याय मागायचा कोणाकडे असा शेतकऱ्यांनी संतप्त सवाल उपस्थित केला.

     गेल्या अनेक वर्षापासून येथे माझी डाळिंबाची फळबाग आहे त्यातून वार्षिक दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळत होते मात्र यावर्षी कंपनीमुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित वायुमुळे डाळिंब पिकाची फळधारणा झाली नाही आलेले फळेही गळून जात आहेत दोन ते तीन लाख रुपये खर्च करून फळबाग पूर्ण वाया गेली आहे माझे यामुळे कंपनीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच भविष्यात जमिनी नापीक होण्याचा धोका तसेच आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
-----------
रघुनाथ बाबुराव शेळके
शेतकरी