Breaking News

आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मिनी सेतू सेवा केंद्राचे उद्घाटन !

आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मिनी सेतू सेवा केंद्राचे उद्घाटन !
-------------
पाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन कामासाठीचे हेलपाटे वाचणार 
-------------
सुनील करंजुले यांनी सुरू केली मिनी सेतू सेवा आ.निलेश लंके यांच्या हस्ते उद्घाटन 


पारनेर प्रतिनिधी - 
      तालुक्यातील पाडळी रांजणगाव याठिकाणी सुनील धोंडीभाऊ करंजुले यांनी मिनी सेतु सुरू केला आहे. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते रविवारी  ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. आजूबाजूच्या गावांनाही या सेतुचा फायदा होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा ऑनलाइन कामांसाठी होणारा हेलपाटा आता थांबणार आहे. 
पाडळी रांजणगाव हे गाव कुकडी पाणलोट क्षेत्र खाली असल्याने बागायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दुग्ध व्यवसायात हे गाव अग्रेसर आहे. त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा पाडळी रांजणगाव हे गाव अग्रेसर आहे. ग्रामपंचायत हद्दीतील लोकवस्ती तीन हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे. दरम्यान सध्या शासकीय कामकाज डिजिटल झाले आहे. त्यामुळे जमिनीच्या सातबारा उतारे यापासून सर्व कामे आता ऑनलाईन झालेले आहेत. पिक विमा याशिवाय कर्जमाफी, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. कृषी क्षेत्रातील सर्व कामकाजाचे डिजिटलायझेशन झालेले आहे. त्यामुळे पाडळी रांजणगावकरांना यासाठी सुपा, शिरूर किंवा पारनेर गाठावे लागत होते. 
       याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. स्मार्टफोन अनेकांकडे असले तरी संबंधित अर्ज कशा पद्धतीने भरायचे याबाबत माहिती नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर गावातील युवक व सामाजिक कार्यकर्ते सुनील धोंडीबा करंजुले यांनी पाडळी रांजणगाव मध्ये मिनी सेतू सुरू केला आहे. यासाठी सीएसईची परवानगी घेण्यात आली आहे. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते या सेतुचे उद्घाटन करण्यात आले. या सेवेचा पाडळी रांजणगाव सह, कळमकरवाडी, कडूस, भोयरे या गावातील ग्रामस्थांना फायदा होणार आहे.
       गावकऱ्यांच्या सोयीसाठी मिनी सेतू सुरू केल्याबद्दल निलेश लंके यांनी सुनील करंजुले यांचे कौतुक केले. तसेच त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती ढोरमले , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ किसन करंजुले, माजी सरपंच मारुती माधव उबाळे, सोसायटीचे सदस्य नवनाथ उघडे, माजी सरपंच कैलास करंजुले, माजी चेअरमन कचरू उबाळे, मल्हारी उबाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखदेव उबाळे, नारायण हरिभाऊ उबाळे, सदाशिव साठे, जय हनुमान आजी-माजी सैनिक संघटना पाडळी रांजणगाव चे अध्यक्ष मच्छिंद्र उबाळे, त्रिमूर्ती डेअरी चेअरमन पंडित करंजुले, अभियंते भरत करंजुले, पाटील उद्योग समूहाचे संचालक गणेश करंजुले, निलेश लंके प्रतिष्ठान चे पाडळी रांजणगाव अध्यक्ष गोरख उबाळे, अजित उबाळे, प्रभाकर करंजुले, रमेश करंजुले  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  जिद्दीच्या सेवेचे  आमदार निलेश लंके यांच्याकडून कौतुक
 --------------
     नामांकित कुस्तीपटू म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या सुनील धोंडीभाऊ करंजुले या निधड्या छातीच्या तरुणाला नऊ वर्षांपूर्वी एका अपघातात दुर्दैवाने अपंगत्व आले. परंतु सुनील खंबीर मनाने या सर्व संकटाला सामोरे गेले. आपलं यापुढील आयुष्य समाजासाठी खर्च करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्याच भावनेतून पाडळी रांजणगाव याठिकाणी मिनी सेतू सेवा त्यांनी सुरू केली. या माध्यमातून त्यांनी इतर तरुणांसमोर वस्तूपाठ ठेवला आहे. त्यांच्या जिद्दीचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले.