Breaking News

चांदेकसारे भागातील अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण !

चांदेकसारे भागातील अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण !


करंजी प्रतिनिधी-
     कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत ग्रामपंचायतीला संपूर्ण बाधीत  कुटुंबांची पंचनामा करण्याची सुचना केली.त्यानंतर महसूल व ग्रामपंचायतीच्या वतीने अवघ्या आठ तासात गावातील जवळपास ५० बाधित  कुटुंबांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले.
       माजी सरपंच केशवराव होन रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमजूर व कष्टकरी कुटुंबांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या लक्षात आणून दिले. माजी आ स्नेहलताताई कोल्हे यांनीही महसूल विभाग व कृषी विभागाला चांदेकसारे पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे व घरात शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना केली. तदनंतर लगेचच पंचनामे करण्यास सुरुवात झाली.
    यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विस्ताराधिकारी, वाघमोडे बी. टी , माजी सरपंच केशवराव होन,सरपंच सौ.पूनम खरात, अर्जुन होन, तलाठी दत्तात्रय बिन्नर ,ग्रामविकास अधिकारी  प्रल्हाद सुकेकर , सचिन आभाळे,मलु होन अदी उपस्थित होते.तलाटी दत्तात्रय बिन्नर व ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी कर्मचारी सोबत घेत बाधित कुटुंबांचे पंचनामे करून घेतले.
   तसेच चांदेकसारे पंचक्रोशीतील सोनेवाडी ,डाऊच खुर्द,घारी अदी परिसरात देखील अतिवृष्टीने  सोयाबीन व मका पिकामध्ये पाणीच पाणी झाले असून सदर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पिकांचेही नुकसानीचे  पंचनामे व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.